Sun, Feb 5, 2023

आदिवासी पाड्यात शालेय साहित्य, नॅपकिनचे वाटप
आदिवासी पाड्यात शालेय साहित्य, नॅपकिनचे वाटप
Published on : 3 January 2023, 1:43 am
बोईसर, ता. ३ (बातमीदार) : नांदगाव तर्फे तारापूर येथील काही युवतींनी नव्या वर्षाचे औचित्य साधून आदिवासी भाग चैतापाडामध्ये लहान मुलांना शालेय दप्तर, महिलांना सॅनिटरी नॅपकिन तसेच गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तेजस्वी घरत तसेच अवनी गावड, श्वेता ठाकूर, सेजल पाटील, निधी ठाकूर, प्राची पाटील, साक्षी पाटील, वैष्णवी पाटील, मृन्मयी पाटील आदी उपस्थित होते.