Fri, Feb 3, 2023

हत्येप्रकरणी दोघे फरारी अटकेत
हत्येप्रकरणी दोघे फरारी अटकेत
Published on : 3 January 2023, 4:01 am
ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : माथाडी संघटना आणि कंत्राटदारीच्या स्पर्धेतून ७ डिसेंबर २०२२ रोजी कशेळी गावात गोळीबार होऊन गणेश कोकाटे याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने मंगळवारी (ता. ३) याप्रकरणी इंदिरानगर वागळे इस्टेट येथून दोन संशयित आरोपींना अटक केली. धनराज तोडणकर (३३, रा. इंदिरानगर, ठाणे) व संदिपकुमार कनोजिया (२७, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे असून, दोघांना न्यायालयाने फरारी घोषित केले होते. हत्येच्या घटनेनंतर दोघेही पोलिसांना गुंगारा देत होते. दोघेही इंदिरानगर येथे येणार असलायची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. दोघांच्या अधिक चौकशीत त्यांनी गणेश कोकाटेची हत्या केल्याची कबुली दिली.