बधवर पार्क येथील बोटींना आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बधवर पार्क येथील बोटींना आग
बधवर पार्क येथील बोटींना आग

बधवर पार्क येथील बोटींना आग

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी कफ परेड कुलाबा बधवार पार्क येथे जेटीवर दुरुस्तीच्या कामासाठी मासेमारी नौका ठेवल्या होत्या. मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागून चार नौका जळून खाक झाल्या तसेच दोन नौकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नौकांवर येथील रहिवाशांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. नौका जळाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन २५ ते ३० कुटुंबांना त्याचा फटका बसला असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. राज्य सरकारकडे नुकसान भरपाई व नौकांचे पुनर्वसन करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सरकारच्या मत्स्य विभागातर्फे पंचनामा करण्यात आला.