Sun, Jan 29, 2023

पूर्ववैमनस्येतून रिक्षा चालकावर वार
पूर्ववैमनस्येतून रिक्षा चालकावर वार
Published on : 3 January 2023, 4:41 am
ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : पूर्ववैमनस्येतून रिक्षा चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३० डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी संदिप साळवे, साईनाथ ऊर्फ छोट्या (रा. वागळे इस्टेट) यांच्यावर गुन्हा दाखल करण्या आला आहे. आनंद तिवारी (२९, रा. वागळे इस्टेट) हा रिक्षा चालक असून, त्याचे दोघांशी यापूर्वी भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून दोघांनी शुक्रवारी रात्री १२.३०च्या सुमारास आनंदला शिवीगाळी करीत कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.