Thur, Feb 2, 2023

चेंबूर येथी सेठ हाईट्स १६ मजली इमारतीला आग!
चेंबूर येथी सेठ हाईट्स १६ मजली इमारतीला आग!
Published on : 4 January 2023, 12:32 pm
चेंबूरमध्ये १६ मजली
इमारतीला आग
चेंबूर, ता. ४ (बातमीदार) ः चेंबूरमधील आशीष सिनेमाजवळील १६ मजली ‘सेठ हाईट्स’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज दुपारी आग लागल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणीही जखमी झाले नाही; परंतु मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही मिनिटांतच इमारतीला लावण्यात आलेल्या बांबूला आग लागल्याने भयभीत झालेले रहिवासी तत्काळ खाली उतरले. आरसीएफ पोलिस ठाणे व चेंबूर अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली.