अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकांची 
रात्र आझाद मैदानात
अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात

अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या हजारो अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानातच रात्र काढली. बुधवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. प्रलंबित मागण्यांसंदर्भात जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, यावर अंगणवाडी सेविका ठाम आहेत.
राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यासांठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून म्हणजेच मंगळवारपासून (ता. ३) आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. प्रमुख मागण्यांवर तोडगा न निघाल्याने त्या आंदोलनावर ठाम आहेत. आजही सरकारच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी देत आंदोलनाला चळवळीचे रूप दिले आहे. तसेच पोवाडे, भारुड आणि कवितांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या कामाचा अनुभव, त्यांना दिली जाणारी वागणूक सर्वांसमोर मांडली. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
---
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आझाद मैदान सोडणार नही हा निर्धार करूनच त्या मुंबईत आल्या आहेत. आम्ही संघटनेतर्फे त्यांच्या एका वेळच्या जेवणाची सोय केली आहे. शिवाय, शहरातील महिलाही त्यांच्यासाठी घरून डबा आणत आहेत.
- राजेश सिंह, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ.