
तडीपार आरोपीविरोधात गुन्हा
ठाणे, ता. ५ (वार्ताहर) ः येथील प्रकाश ऊर्फ राहुल पांडुरंग धोत्रे (वय २४) या आरोपीला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, नवी मुंबई या जिल्ह्याच्या महसूल हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दार करण्यात आले होते, पण ओळख लपवून धोत्रे वागळे परिसरात वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश ऊर्फ राहुल पांडुरंग धोत्रे हा वागळे इस्टेट येथीलच रहिवासी आहे. त्याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे दोन वर्षांकरिता पाच जिल्ह्यातून २३ फेब्रुवारी २०२२ रोजी तडीपार केले होते; मात्र पोलिसांचा मनाई आदेश झुगारून धोत्रे येथे राहत होता. ३ जानेवारी रोजी संध्याकाळी तो वागळे इस्टेट पोलिसांना नेहरूनगर, रोड नं. १६ येथे राहताना आढळला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात मनाई आदेशाचा भंगप्रकरणी गुन्हा दाखल केला.