मुंबई पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा सन्मान
मुंबई पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुंबई पोलिस दलातील दहा कर्मचाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : मुंबई पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ‘उत्कृष्ट सार्वजनिक सेवा’ पुरस्कार देत पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कर्तव्यावर असताना त्यांनी निःस्वार्थी आणि धाडसी कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिस दलातील तीन महिला कर्मचाऱ्यांसह १० पोलिसांना पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे राम गांधी, अनंत सिंघानिया, समीर सोमय्या, संजय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.