Sun, Feb 5, 2023

मालवणीत १८ किलो गांजा जप्त
मालवणीत १८ किलो गांजा जप्त
Published on : 6 January 2023, 2:47 am
मुंबई, ता. ६ : गांजा तस्करीप्रकरणी मालवणी परिसरातून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. भगतसिंग राठोड असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मालवणी पोलिस गस्त घालत असताना सदर आरोपीच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसाना संशय आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेतून १८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत १० लाख एवढी आहे. आरोपी राजस्थानहून गांजा घेऊन मुंबईत विक्री करणार होता, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.