हार्बर, ट्रान्सहार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हार्बर, ट्रान्सहार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
हार्बर, ट्रान्सहार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

हार्बर, ट्रान्सहार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वेरुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ८ जानेवारीला मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर पश्चिम रेल्वेवर अंधेरी-बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

हार्बर रेल्वे
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.०९ पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवाही रद्द राहणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्सहार्बर रेल्वे
कुठे : ठाणे-वाशी/नेरूळ अप-डाऊन मार्ग
वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरूळ/पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप-डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे
कुठे : अंधेरी-बोरिवली अप-डाऊन जलद मार्ग
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप-डाऊन उपनगरीय लोकल रद्द राहतील. तसेच बोरिवलीच्या काही धीम्या गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावकडे वळवण्यात येणार आहेत.