मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला  ?
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला ?

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला ?

sakal_logo
By

मुंबईचा अर्थसंकल्प
३ फेब्रुवारीला?
मुंबई, ता. ६ ः मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ तारखेला सादर केला जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाचे सक्षमीकरण, मुंबई पालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे व मुंबईकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाईल. अर्थसंकल्पात तीन ते चार हजार कोटींनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून डॉ. इक्बाल सिंह चहल मांडणार असून तेच मंजुरी देणार आहेत.
मुंबई महापालिकेकडून सन २०२२-२३ मध्ये ४५ हजार ९४९.२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता; मात्र यंदा पालिका निवडणूक लांबल्याने सद्या मुंबई महापालिकेतील कारभार प्रशासकांकडून चालवला जात आहे. त्यामुळे सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक असलेले डॉ. इक्बाल सिंह चहल मांडणार असून तेच मंजूर करणार आहेत. महापालिकेचा अर्थसंकल्प ५ फेब्रुवारीपूर्वी सादर करणे बंधनकारक असल्याने शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता आहे.