कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देवदूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देवदूत
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देवदूत

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देवदूत

sakal_logo
By

विक्रम गायकवाड ः नवी मुंबई
कॅन्सर झाला म्हणजे सर्व काही संपले... असा बहुतेकांचा समज होतो. शिवाय या आजारावरील उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण पार खचून जातात. अशा रुग्णांची गरज समजून घेऊन त्या प्रकारची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री करत आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना फक्त मदतच करत नाहीत, तर त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करत राज्यातील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूतच झाले आहेत.
------------------------------------------
मूळचे नाशिक जिल्ह्यातील असलेले रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री १९९० पासून कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करत आहेत. १९९० मध्ये विद्यार्थी दशेत असताना अग्निहोत्री यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला प्लेटलेटसचे दान केले होते. त्या वेळी त्यांनी कॅन्सग्रस्त रुग्णांचे दुख, त्यांना होणारा त्रास, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी प्रत्यक्षात पाहिल्यानंतर निस्वार्थीपणे रुग्णसेवा करण्याचे मनोमन ठरवले. तेव्हापासून आजपर्यंत ते कॅन्सरग्रस्त रुग्णांना शक्य होईल तेवढी मदत करत आहेत. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी दरदिवशी देशभरातील अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. यातील बहुतेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक पहिल्यांदा मुंबईत आलेले असतात. तसेच अनेकांचे मुंबईत कुणी नातेवाईकसुद्धा नसतात. त्यामुळे टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी कुठून सुरुवात करायची इथून या रुग्णांची सुरुवात असते, अशा रुग्णांना रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री वाटाड्या असल्यासारखी मदत करतात.
---------------------------------------
रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान
मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या राज्य आणि राज्याबाहेरील गरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्ताची तीव्र आवश्यकता असते. राज्याबाहेरील रुग्णांचे येथे कोणीही नातेवाईक नसतात. अशा वेळी त्यांना असणारी रक्ताची निकड पूर्ण करण्यासाठी अग्निहोत्री प्रयत्न करतात. कॅन्सरग्रस्त रुग्णांना लागणारे रक्त व प्लेटलेटस् दान करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहित करण्यासाठी शिबिरे घेतात.
----------------------------------------
ऑक्सिजन बँकेचा अभिनव उपक्रम
कोरोना काळात ऑक्सिजन बँक हा विशेष उपक्रम राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे कोविड काळात गंभीर रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. गरीब कॅन्सर रुग्णांना कोरोना काळात उपचारांसाठी आर्थिक साह्य मिळवून देण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच महात्मा फुले योजनेमध्ये कॅन्सरच्या चाचण्या अंतर्भूत करण्याची मागणी कॅन्सरग्रस्त रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजना तसेच आयुष्यमान योजनेबाबत जनजागृतीही केली आहे.
----------------------------------------
अनेक पुरस्कारांनी सन्मान
रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकताच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अग्निहोत्री यांचा वैद्यकीय सेवा सन्मान देऊन गौरव केला आहे. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने यशवंत सन्मान पुरस्कार २०२१ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात भरीव कार्य केल्याने टाटा हॉस्पिटलने त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन दोन वेळा सन्मान केला आहे.