किरण करण ज्ञानालंकार पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरण करण ज्ञानालंकार पुरस्काराने सन्मानित
किरण करण ज्ञानालंकार पुरस्काराने सन्मानित

किरण करण ज्ञानालंकार पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

किन्हवली, ता. ७ (बातमीदार) : येथील विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या ठुणे येथील शारदा विद्यालयातील सहशिक्षक किरण करण यांना ज्ञानालंकार पुरस्काराने गौरवण्यात आले. शहापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ तसेच शहापूर तालुका शिक्षक सेनेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते व जनकल्याण पतपेढी व जनकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सातत्याने मिळवलेल्या उज्ज्वल यशामुळे, गणित व विज्ञान विषयांतील उत्कृष्ट अध्यापनामुळे त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शहापूर येथील म. ना. बरोरा विद्यालयात आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.