सराईत रिक्षाचोर पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत रिक्षाचोर पोलिसांच्या ताब्यात
सराईत रिक्षाचोर पोलिसांच्या ताब्यात

सराईत रिक्षाचोर पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ७ (बातमीदार) ः रिक्षा चोरीप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) अरुण राठोड या तरुणाला अटक केली. त्याने चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील दिवाण म्हाडा वसाहतीतून बुधवारी (ता. ४) रिक्षा चोरून पळ काढला होता. रिक्षाचे मालक फुलाजी पोटफोडे यांनी याविषयी आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सहायक निरीक्षक किरण मांढरे यांच्या पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात केली. खबऱ्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने माहुल परिसरातून अरुणच्या मुसक्या आवळत चोरलेली रिक्षा जप्त केली. चौकशीदरम्यान याआधीही त्याने दोन गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.