Fri, Feb 3, 2023

ममता दिनानिमित्त विविध वस्तूंचे वाटप
ममता दिनानिमित्त विविध वस्तूंचे वाटप
Published on : 7 January 2023, 11:33 am
विरार, ता. ७ (बातमीदार) : ममता दिनानिमित्त शिवसेनेचे सायमन मार्टिन संचालित सहयोग सेंटर भुईगाव वसई येथे नवघर माणिकपूर शहराच्या वतीने विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, संचालक सायमन मार्टिन, शहर प्रमुख संजय गुरव, शहर संघटक जशिंथा फिंच, उपशहर प्रमुख शशिभूषण शर्मा, रश्मी राव, स्नेहल सावंत, अर्चना देवळेकर, शीतल शिंग, श्रवनती घोराई, योगिता तीटमे, साधना मौर्या, जेनेत परेरा आदी उपस्थित होते.