विकासकामातून शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामातून शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी
विकासकामातून शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी

विकासकामातून शहरी-ग्रामीण भागातील दरी कमी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : शहरी भागात उपलब्ध असलेल्या सोयी, संधी ग्रामीण भागाला पुरवण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेने प्राधान्य द्यावे. त्यातून शहरी व ग्रामीण भागातील विकासाची दरी कमी होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल केले.
केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने नवी दिल्ली येथे प्रकल्पप्रणीत पंचायत समिती विकास आराखडा (बीपीडीपी) आणि जिल्हा परिषद विकास आराखड्याची (डीपीडीपी) माहिती देण्यासाठी एका राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्‍घाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वळी ते बोलत होते. या राष्ट्रीय कार्यशाळेचा उद्देश, प्रकल्पप्रणीत तालुका पंचायत विकास आराखडा आणि जिल्हा पंचायत विकास आराखडा योजनेचा अंगीकार करणे, त्यामागची संकल्पना स्पष्ट करणे आणि हा आराखडा लोकप्रिय करणे हा आहे. ज्यामुळे पंचायत विकास योजनांच्या प्रक्रिया आणि अंमलबजावणी प्राधान्याने होऊन त्याला गती देता येईल.

-----------------
कार्यशाळेत देशभरातील प्रतिनिधी सहभागी
या कार्यशाळेत देशभरातील ६५० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विविध महत्त्वाची मंत्रालये-विभाग, नाबार्ड, इर्मा, युनिसेफसारख्या विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधीही कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.