Wed, Feb 1, 2023

ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत
ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत
Published on : 8 January 2023, 3:44 am
मुंबई, ता. ८ : परदेशातील सहलीच्या नावाने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी जेरबंद केले. जिग्नेश मकवाना, हिरेश सतरा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहलीबाबत वृत्तपत्रातील जाहिरात पाहून पीडित व्यक्तीने संपर्क साधला. आरोपीनी पीडितांकडून सहलीसाठी ऑनलाईन पैसे घेतले; परंतु सहलीला नेले नाही आणि नंतर पैसे परतही दिले नाहीत. अखेरीस पीडित व्यक्तीने कस्तुरबा मार्ग पोलिसात गुन्हा नोंद केला. आरोपी मालवणी परिसरात असल्याबाबत माहिती पोलिसांना प्राप्त झाली आणि त्यानुसार सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्यांनी अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.