Sun, Jan 29, 2023

सिद्धार्थ भवारला पॉवर लिफ्टींगमध्ये कास्यपदक
सिद्धार्थ भवारला पॉवर लिफ्टींगमध्ये कास्यपदक
Published on : 9 January 2023, 11:46 am
मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील शिवळे महाविद्यालयातील सिद्धार्थ भवार याला मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्पर्धेमधील पॉवर लिफ्टिंग विभागात कास्य पदक मिळाले. साळवी कॉलेज कळवा, ठाणे या ठिकाणी पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ ठाणे झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिद्धार्थ याने १२० किलो वजनी गटात कास्यपदक पटकावले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, देवगावचे पोलिस पाटील गणेश तुपे, रिपाइंचे कार्यकर्ते गणेश अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तथा वकील शरद थोरात यांनी सिद्धार्थ व त्याच्या आईवडिलांचे अभिनंदन केले.