
जोगेश्वरीत आजपासून ‘कला-क्रिडा महोत्सव’
जोगेश्वरी, ता. ९ (बातमीदार) ः जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच विभागातील विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना अधिक वाव देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधात आमदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ‘कला-क्रीडा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळी १० वाजता याचे उद्घाटन आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा महोत्सव १० ते २३ जानेवारी या कालावधीत पूनम नगर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात लांब उडी, कबड्डी, गोळा फेक, धावणे, डॉज बॉल, बुद्धिबळ, क्रिकेट, रिले स्पर्धा, हस्ताक्षर, कॅरम, समूह गीत, लोककला नृत्य आदी स्पर्धांचा समावेश असून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.