Fri, Jan 27, 2023

शालेय बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
शालेय बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Published on : 9 January 2023, 12:31 pm
पोलादपूर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव वेगाने मार्गस्थ होणाऱ्या खासगी शालेय बसच्या धडकेत पादचाऱ्याचा रविवारी (ता. ८) सायंकाळी मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून एमएच ३७ बी ३८८० या बसचा चालक कैलास पांडुरंग टेकाळे (वय ४४, रा. रिसोड, वाशीम) हे पोलादपूर बाजूकडून महाडकडे जात होते. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाजवळ आले असता त्याच वेळी रस्ता ओलांडणारे तानाजी जाधव (वय ४८, रा. आदिवासी वाडी, कापडे) यांना बसची जोरदार धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी महेंद्र सकपाळ यांनी पोलादपूर पोलिसांत फिर्याद दिली. महामार्गावर फ्लायओव्हर कमी असल्याने पादचारी रस्ता ओलांडत आहेत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.