गोखले उड्डाणपूलाचे पाडकाम मंगळवारपासून! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले उड्डाणपूलाचे पाडकाम मंगळवारपासून!
गोखले उड्डाणपूलाचे पाडकाम मंगळवारपासून!

गोखले उड्डाणपूलाचे पाडकाम मंगळवारपासून!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान असलेला गोखले उड्डाणपूल बंद केल्यानंतर आता रेल्वेने गोखले उड्डाणपूल पाडकामासाठी सलग पाच दिवस चार तासांचे अप आणि डाऊन मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक १० ते १४ जानेवारीला मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
गोखले पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला होता; मात्र रेल्वे हद्दीतील हा उड्डाणपूल धोकादायक असल्याने तो पाडून नवा बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबरपासून हा उड्डाणपूल बंद करण्यात आला आहे. आता हा उड्डाणपूल पश्चिम रेल्वेकडून पाडण्यात येणार आहे. रेल्वे रुळावरील पुलाचा भाग हटवण्यासाठी रेल्वेने तब्बल २० तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक पाच टप्प्यांत घेण्यात येणार आहे. त्यानुसार पुलाच्या पाडकामासाठी सलग पाच दिवस चार-चार तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक घेतला आहे. पश्चिम रेल्वेचा डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अप- डाऊन हार्बर मार्गावर रात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत असणार आहे. या काळात सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे विलेपार्ले स्थानकात दोन वेळा लोकल थांबणार आहे; तर प्लॅटफॉर्मअभावी राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही.
-------
विरार ते चर्चगेट रात्री ११.४० आणि अंधेरी ते चर्चगेट रात्री १२.४६ ची लोकल गोरेगाव ते अंधेरीदरम्यान जलद मार्गांवरून धावणार आहे. ब्लॉक झाल्यानंतर अंधेरी ते विरार लोकल पहाटे ४.४० वाजता सुटणार आहे.
--------
या लोकल जलद मार्गांवरून
चर्चगेट ते भाईंदर रात्री ११.२७, ११.३८, १२.०९, १२.१६, १२.२८, १२.४३, नालासोपारा रात्री ११.४६, बोरिवली रात्री ११.५२, १ वाजता, विरार रात्री ११.५८, १२.२०, १२.५०, अंधेरी रात्री १२.३१.