ग्राहक पंचायतीचा वार्षिक सोहळा उत्साहात

ग्राहक पंचायतीचा वार्षिक सोहळा उत्साहात

पालघर, ता. १० (बातमीदार) : मुंबई ग्राहक पंचायतीच्या पालघर विभागाचा वार्षिक सोहळा केळवे येथील मंगलधाम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुंबई ग्राहक संघाचे खजिनदार रवींद्र सहस्रबुद्धे व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ग्राहकांच्या पाल्यांसह महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारविजेते राजेश वर्तक, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते सचिन चुरी आणि मुंबई विद्यापीठाच्या एमएस्सी परीक्षेतील गणित विषयातील सुवर्णपदक विजेती रिद्धी पाटील या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ऋचा थत्ते यांनी सादर केलेल्या हलकंफुलकं या मनोरंजक कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळा यशस्वी करण्यासाठी नंदा तोडणकर, संदेश चुरी, विजय सावे, विनय पाटील व जयश्री पाटील यांनी मेहनत घेतली; तर आशिका घरत यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com