शांता जोग स्मृती एकांकिका स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांता जोग स्मृती एकांकिका स्पर्धा
शांता जोग स्मृती एकांकिका स्पर्धा

शांता जोग स्मृती एकांकिका स्पर्धा

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ (बातमीदार) ः ज्येष्ठ अभिनेत्री दिवंगत शांताबाई जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी ‘शांताबाई जोग स्मृती एकांकिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सोनल प्रोडक्शन पुरस्कृत या स्पर्धेचे यंदा ४१ वे वर्ष आहे‌. ही स्पर्धा २१ ते २४ जानेवारीदरम्यान रोज संध्याकाळी सहा वाजता घेण्यात येईल. प्रत्येक दिवशी चार एकांकिका याप्रमाणे चार दिवसांसाठी फक्त पहिल्या प्रवेश घेणाऱ्या १६ एकांकिकांना या स्पर्धेत प्राधान्य देण्यात येणार आहे. मंडळाचे कार्यक्षेत्र हे चेंबूर, टिळकनगर येथे आहे. येथील श्री गणेश नाट्यमंदिराच्या आवारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या एकांकिकेला रोख रक्कम आणि शांताबाई जोग फिरता चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय द्वितीय आणि तृतीय एकांकिकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. दिग्दर्शन, स्त्री-पुरुष अभिनय यांच्यासाठी सुद्धा तीन रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत यांच्यासाठी प्रत्येकी रोख रक्कम देण्यात येणार आहे.
संपूर्ण एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या स्त्री-पुरुष एका कलाकाराला ज्येष्ठ नाट्य समीक्षक अनंत घोगळे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक नंदकुमार पाटील ९८६९००८८०५, स्पर्धा संयोजक विशाल बिलये ९६१९२५१५७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.