Sun, Jan 29, 2023

पीपीएलमध्ये आरपी लॉयन संघाची बाजी
पीपीएलमध्ये आरपी लॉयन संघाची बाजी
Published on : 11 January 2023, 11:04 am
विक्रमगड, ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सध्या सर्वत्र क्रिकेटचे फिवर दिसत आहे. अनेक ठिकाणी प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यासाठी मानाचे असणारे पालघर प्रीमियर लीगचे पालघर येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा पातळीवरील १२ संघांनी सहभाग घेऊन २३ सामने खेळवण्यात आले. या वेळी जिल्ह्याभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अत्यंत अतितटीच्या सामन्यात आर. पी. लॉयन पिके कंन्टरॅक्शन विक्रमगड संघाला दोन लाखांचे प्रथम पारितोषिक; तर पॅराडाईज स्वरा-बोईसर संघाला द्वितीय क्रमांकाचे १ लाख रुपये बक्षीस देण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विश्वनाथ जाधव, धानिव याला मालिकावीर म्हणून मोटरसायकल बक्षीस देऊन गौरवण्यात आले.