मतिमंद मुलांसमवेत शिक्षक संघटन दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतिमंद मुलांसमवेत शिक्षक संघटन दिन साजरा
मतिमंद मुलांसमवेत शिक्षक संघटन दिन साजरा

मतिमंद मुलांसमवेत शिक्षक संघटन दिन साजरा

sakal_logo
By

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुरबाडजवळील शिरवली येथील तारांगण मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे शिक्षक संघटन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयवंत मुरबाडे; तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे निमंत्रित सदस्य भगवान भगत, प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालक रघुनाथ इसामे, मुरबाड तालुका अध्यक्ष सोमनाथ सुरोशे, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक एकनाथ देसले आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील एका विद्यार्थ्याचा वाढदिवससुद्धा साजरा करण्यात आला. यावेळी राज्य पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. नीळकंठ व्यापारी यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दीपश्री इसामे, पद्माकर यशवंतराव यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रवींद्र मोहपे यांनी, सूत्रसंचालन सोपान गोल्हे यांनी; तर सरचिटणीस शैलेश इसामे यांनी आभार मानले.