ज्येष्ठ लेखिका संगीता कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ लेखिका संगीता कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ लेखिका संगीता कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ लेखिका संगीता कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : एकता कल्चरल अकादमीतर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ लेखिका, कवयित्री संगीता कुलकर्णी यांना ‘मृणाल गोरे स्मृती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी (ता. १४) गिरगाव येथे साहित्य संघ नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संगीता कुलकर्णी या कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या माजी अध्यक्ष राहिल्या आहेत. ‘संगीतपुष्प’, ‘पारिजात’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित असून, त्या स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करतात. दिवाळी अंक, विविध मासिकांतून त्यांच्या कथा, ललित कथा, कविता लेखन प्रसिद्ध होत असते. तसेच वृत्तपत्रांतून सातत्याने विविध विषयांवरील लेख, पुस्तक परिक्षणे आदी सदरांचे लेखनही सुरू असते.