ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

मुंबई, ता. ११ ः रंगभूमीबरोबरच चित्रपट, जाहिराती आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे (वय ८९) यांचे आज (ता. ११) सकाळी निधन झाले. मागील दीड वर्षांहून अधिक काळ त्यांच्यावर मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
५० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या नवाथे यांनी अनेक भूमिका साकारल्या. १९५२ मधील ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून चित्रा नवाथे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘गुळाचा गणपती’, ‘देवबाप्पा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘बोलविता धनी’ या चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या, तर ‘बोक्या सातबंडे’, ‘अगडबम’, ‘टिंग्या’ या चित्रपटात त्यांनी आजीच्या भूमिका साकारल्या होत्या.
चित्रा यांचा विवाह निर्माते-दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी झाला होता. २००५ मध्ये त्यांचेही आजारपणाने निधन झाले, तर त्यांच्या मुलाचे तरुण वयातच अपघाती निधन झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना सरला नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com