कोडियन मिश्रित सिरफचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोडियन मिश्रित सिरफचा साठा जप्त
कोडियन मिश्रित सिरफचा साठा जप्त

कोडियन मिश्रित सिरफचा साठा जप्त

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरातून शिवाजी नगर पोलिसांनी फारुक अन्सारी याला ताब्यात घेत कोडियन हा अमली पदार्थ असलेल्या कफ सिरफच्या बाटल्या जप्त केल्या. बुधवारी (ता. ११) पहाटे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये त्याच्याकडून १९ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्यांची किंमत ७६०० रुपये इतकी आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून सायंकाळी अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील निरीक्षक इकबाल शिकलगार व सहायक निरीक्षक धनंजय देवडीकर यांचे पथक बुधवारी पहाटे बैंगणवाडी परिसरात गस्त घालत होते. नवीन बस डेपोजवळ हे पथक आले असता त्या ठिकाणी फारूक हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या जवळ कोडियन मिश्रित १९ बाटल्या सापडल्या. त्याने त्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्या होत्या. त्यानंतर त्या बाटल्या जप्त करून त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून एक टॅक्सी तसेच मोबाईलदेखील जप्त केला असून सहायक निरीक्षक धनंजय देवडीकर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.