Mon, Feb 6, 2023

बांदोडकर महाविद्यालयात आज राष्ट्रीय परिषद
बांदोडकर महाविद्यालयात आज राष्ट्रीय परिषद
Published on : 12 January 2023, 11:47 am
ठाणे, ता. १२ : विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालयाच्या गणित आणि संख्याशास्त्र विभागातर्फे शुक्रवारी (ता. १३) आणि शनिवारी (ता. १४) अप्लाईड मॅथेमेटिक्स ॲण्ड स्टॅटिस्टिक या विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत गणित आणि संख्याशास्त्र विषयातील नामांकित प्राध्यापक आणि संशोधक त्यांचे शोधनिबंध सादर करणार आहेत. याबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित आणि संख्याशास्त्र विषयातील रुची वाढवण्याकरता पोस्टर सादरीकरणाची स्पर्धादेखील आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेला नोंदणी करण्याकरिता ७२०८८४१२१० या क्रमांकावर अथवा sashaikh@vpmthane.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.