Mon, Feb 6, 2023

महाराष्ट्र सेवा संघातर्फे रविवारी व्याख्यान
महाराष्ट्र सेवा संघातर्फे रविवारी व्याख्यान
Published on : 12 January 2023, 12:08 pm
मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘भारत परत एकदा विश्वगुरू बनेल का?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे तब्बल १९ वर्षांनंतर जेफ्री आर्मस्ट्राँग (कवींद्र ऋषी) या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी (ता. १५) संध्याकाळी सहा ते साडेसात यादरम्यान सेवा संघाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहामध्ये होणार आहे. व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे असे कार्यक्रम या दिवशी होणार आहेत. कार्यक्रम मोफत असून सर्व मुलुंडकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.