Wed, Feb 1, 2023

टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Published on : 12 January 2023, 4:51 am
अंधेरी, ता. १२ (बातमीदार) : टेम्पोची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ११) रात्री उशिरा पावणेदोन ते अडीचच्या सुमारास सांताक्रूझ येथील आंबेडकर चौकात घडली. पायल वालेचा, चंद्रकांत सरदार अशी दोघा मृतांची नावे आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक शिवजतन यादव याला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र वालेचा नवी मुंबईतील ऐरोलीत राहतात. पायल ही चंद्रकांत यांच्यासोबत नवी मुंबईला जात होती. दुचाकी आंबेडकर चौकात येताच टेम्पोने त्यांना धडक दिली होती. यात चंद्रकांत आणि पायल हे दोघेही जखमी झाले. त्यांना पोलिसांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.