कल्याणची कबड्डीपट्टू दिक्षावर काळाचा घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणची कबड्डीपट्टू दिक्षावर काळाचा घाला
कल्याणची कबड्डीपट्टू दिक्षावर काळाचा घाला

कल्याणची कबड्डीपट्टू दिक्षावर काळाचा घाला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : शिर्डीला जाणाऱ्या १० भाविकांच्या अपघाती मृत्यूमध्ये कल्याणची कबड्डीपट्टू दीक्षा गोंधळी (वय १७) हिचादेखील समावेश आहे. ती आई-वडिलांसोबत शिर्डीला जाण्यासाठी अपघातग्रस्त बसमधून प्रवास करत होती. या अपघातात दीक्षा हिची आई गंभीर जखमी झाली आहे; तर तिची बहीण समीक्षा हिची शिकवणी असल्याने ती जाऊ शकली नाही. त्यामुळे ती या अपघातातून बचावली आहे.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गोंधळी कुटुंब राहत आहे. मोरिवली गावात दीक्षाची काकी राहण्यास असून त्यांच्यासोबत गोंधळी कुटुंब हे शिर्डीला जाण्यास निघाले होते. गोंधळी कुटुंब दर वर्षी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी खासगी गाडी करून जातात. या वर्षी ते बसने गेले आणि काळाने त्यांचा घात केला. दीक्षा ही मॉडेल महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होती. दीक्षा महाविद्यालयात कबड्डी आणि शॉर्टबॉल खेळत असल्याची माहिती तिच्या मैत्रिणींनी दिली. तिचे वडील हे ठाणे येथे खासगी नोकरी करत होते. दीक्षाविषयी माहिती मिळताच तिच्या मैत्रिणींनी तिच्या घराजवळ धाव घेतली. तिच्या निधनाने कल्याण परिसरात शोकाकूल वातावरण होते.