गेल्या वर्षभरात एसटीचे बाराशे अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेल्या वर्षभरात एसटीचे बाराशे अपघात
गेल्या वर्षभरात एसटीचे बाराशे अपघात

गेल्या वर्षभरात एसटीचे बाराशे अपघात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः राज्यात ७ दिवसांच्या रस्ता सुरक्षा अभियानांमध्ये सर्वत्र रस्ते वाहन अपघातांची चर्चा केली जात आहे. त्यातच चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहचलेल्या सार्वजनिक प्रवासी सेवा असलेल्या एसटीचेसुद्धा गेल्या वर्षभरात अनेक गंभीर अपघात बघायला मिळाले आहेत. गेल्या वर्षभरात एसटीचे १२८१ अपघात झाले असून यात १५१ लोकांचा मृत्यू झाला आहे.

एसटी महामंडळाच्या बसच्या अपघातांमध्ये वर्ष २०१८-१९ मध्ये प्राणांतिक ३७७, गंभीर १९७४, किरकोळ ९५९ असे एकूण ३३१० अपघात झाले होते; तर २०१९-२० मध्ये प्राणांतिक ३६०, गंभीर १५५३ आणि किरकोळ १४२४ असे एकूण ३३३७ अपघात झाले होते. या तुलनेत २०२१-२२ मध्ये प्राणांतिक १३०, गंभीर ५८४, किरकोळ ५६७ असे एकूण १२८१ अपघात झाले. या काळात कोरोनाची माहामारी आणि संपकाळामुळे एसटीच्या सेवा बंद असल्याने अपघातांची संख्या घटली.

एसटीच्या अपघातांमध्ये सर्वाधिक नुकसान रस्त्यांवरील प्रवाशांचे झाले आहे. बसच्या अपघातांमध्ये गेल्या सात वर्षांमध्ये सर्वाधिक मृतांची संख्या रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांची असल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाने नोंद केलेल्या माहितीनुसार गेल्या सात वर्षांत ३०४ एसटी प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ५८ एसटी कर्मचारी आणि २१८८ रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या सात वर्षांत २५४२ मृत्यू झाले.
------
जखमींची आकडेवारी (वर्ष २०२१-२२)
एसटी प्रवासी - ६०८
एसटी कर्मचारी - १११
पादचारी - ६२
इतर ३४९
एकूण - ११३०