मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत आज संपणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत आज संपणार
मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत आज संपणार

मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत आज संपणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातील रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याप्रमाणे रविवारी मुदत संपणार असून त्यानंतर मीटर रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये दरदिवशी ५० रुपये; तर जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
गेल्या वर्षी ऑटो रिक्षा व टॅक्सीच्या दरवाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम १.५ किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २१ रुपये होता. आता वाढीव दर २३ रुपये असा ठरवण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १४.२० रुपये होता, तो आता १५.३३ पैसे केला आहे. टॅक्सीसाठी प्रथम १.५ किमीसाठी पूर्वी २५ रुपये होता. तो आता २८ रुपये असा ठरवण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १६.९३ पैसे होता, तो आता १८.६६ पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम १.५ किमीसाठी पूर्वीचा दर ३३ रुपये भाडेदर होता, तो आता ४० रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर २२.२६ पैसे होता, तो सुधारित २६.७१ पैसे असा ठरवण्यात आला असून नवीन भाडेवाढ गेल्या वर्षी १ ऑक्टोबरपासून अंमलात आली आहे. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रिक्षा, टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन १०० टक्के होणे अपेक्षित होते; मात्र अद्यापही रिक्षा आणि टॅक्सी मिळून अद्याप ५० टक्के वाहन विनारिकॅलिब्रेशन रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करत आहे.
...
रिकॅलिब्रेशनची स्थिती
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य मुंबईत २६,७३८ एकूण काळी पिवळी टॅक्सी आहेत. त्यापैकी ६८.२९ टक्के टॅक्सी रिकॅलिब्रेशन झाले आहे. पश्चिम मुंबईत ६,४१८ एकूण काळी पिवळी टॅक्सींची संख्या असून, ५२.९८ टक्के वाहन रिकॅलिब्रेशन झाले तर मुंबई पूर्व आरटीओअंतर्गत ८,२६४ टॅक्सी असून त्यापैकी ५०.४१ टक्के रिकॅलिब्रेशन झाले आहे. पश्चिम मुंबईत ५६,००८ रिक्षा असून ७३.३६ टक्के रिक्षांचे रिकॅलिब्रेशन झाले; तर मुंबई पूर्वमध्ये ८२,३६८ रिक्षा असून ५६.६८ टक्के रिक्षांचे रिकॅलिब्रेशन झाले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.