वसईत रंगली पार्कातल्या कवितांची मैफल

वसईत रंगली पार्कातल्या कवितांची मैफल

विरार, ता. १५ (बातमीदार) : कवी विजय उतेकर आणि स्वरूपा सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पार्कातल्या कवितांची ४९ वी काव्यमैफल नुकतीच वसई येथील सुरुची बाग येथे पार पडली. शिल्पा परुळेकर-पै यांच्या शब्दांगण साहित्य प्रतिष्ठानने या मैफलीचे आयोजन केले होते. ही मैफल दिवंगत कवी नलेश पाटील यांना समर्पित होती. या मैफलीत ज्येष्ठ कवयित्री संगीता अरबुने यांच्यासोबत कीर्ती पाटसकर, अनुराधा म्हापनकर, जितेंद्र लाड, डॉ. सुरेखा धनावडे, डॉ. सखाराम डाखोरे, राहुल अहिरे, नीता श्रीवास्तव यांनी कविता सादर केल्या. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या मैफलीचे सूत्रसंचालन कवी सदानंद बेंद्रे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com