Sun, Jan 29, 2023

रेल्वे मंडळाचा अध्यक्षांनी
घेतला रेल्वे प्रकल्पाचा आढावा
रेल्वे मंडळाचा अध्यक्षांनी घेतला रेल्वे प्रकल्पाचा आढावा
Published on : 15 January 2023, 2:41 am
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि हेरिटेज स्थानक असलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार लाहोटी मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सर्व तयारीचा आणि रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेतला. लाहोटी यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित बैठकीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध प्रकल्पांशी संबंधित विषयांवर चर्चा केली.