प्रकाश निकम यांची मलवाडा रुग्णालयाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश निकम यांची मलवाडा रुग्णालयाला भेट
प्रकाश निकम यांची मलवाडा रुग्णालयाला भेट

प्रकाश निकम यांची मलवाडा रुग्णालयाला भेट

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मलवाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या व कर्मचारी निवासस्थान होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मलेरिया कर्मचारी पदे भरण्यात यावीत, अशी मागणी या वेळी येथील ग्रामस्थांनी केली. या वेळी संपूर्ण कर्मचारी वर्ग व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, भूषण महाकाळ उपस्थित होते.