म्हसोबा यात्रेची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसोबा यात्रेची सांगता
म्हसोबा यात्रेची सांगता

म्हसोबा यात्रेची सांगता

sakal_logo
By

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : तब्बल अकरा दिवस भाविकांच्‍या प्रचंड प्रतिसादानंतर सोमवारी सायंकाळी मंदिरात सत्यनारायणाची पूजा करून म्हसा यात्रेची सांगता झाली. सत्यनारायणाच्या पूजेचा मान व्यापारी विजयसिंह राठोड यांना; तर आरतीचा मान काळूबाई कुरले यांना मिळाला. मंदिरात माऊली कृपा हरिपाठ मंडळातर्फे हरिपाठ सादर करण्यात आला; तर खांबलिंगेश्र्वर भजन मंडळ गायक हरिभाऊ कुरले व स्वरसारंग भजन मंडळ सरळगावचे गायक संजय घुडे यांची गायन सेवा झाली. याप्रसंगी खांबलिंगेश्र्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ पष्टे, उपाध्यक्ष शाम शेटे, सचिव बाळू कुरले, विश्वस्त रामचंद्र कुरले, भालचंद्र कुरले, अरुण कुरले उपस्थित होते.
म्हसोबा यात्रेत मिठाई, ब्लँकेट, खेळणी, टोपल्या, गृहोपयोगी वस्तू यांना प्रचंड मागणी होती. यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी आलेल्या विविध खेळ व आकाश पाळण्‍यांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी बंदोबस्त तैनात केल्याने यात्रेत गडबड गोंधळ झाला नाही. एसटी महामंडळाने जादा बस गाड्या सोडून यात्रेकरूंची चांगली सोय केल्याबद्दल देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्‍यात आले. पशूवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग यांनीसुद्धा चांगली सेवा दिल्या. म्हसा ग्रामपंचायतीमार्फत पाणी व विविध सुविधा पुरविण्यात आल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
म्हसोबा यात्रेचे उत्कृष्टरीत्या वार्तांकन केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानण्‍यात आले.