
सिडकोच्या भूखंडांवरील अतिक्रमणावर कारवाई होणार
वाशी, ता. १७ (बातमीदार) : सिडकोच्या भूखंडांवर बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या नर्सरी व ज्या नर्सरींचा करार संपुष्टात येऊनसुद्धा अनेक नर्सरी उभ्या आहेत, अशा नर्सरींवर सिडकोच्या अतिक्रमण पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिला.
सिडकोच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडावर बेकायदा नर्सरी थाटण्यात आल्या आहेत. तसेच सिडकोकडून नर्सरीधारकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यांचा करार संपुष्टात आलेला असतानासुद्धा नर्सरी सुरू आहेत, अशा नर्सरींवर सिडकोकडून कारवाई करण्यात येणार आहे. सिडकोकडून कारवाई करण्यात येणार असल्यामुळे बेकायदा थाटण्यात आलेल्या नर्सरीधारकांचे धाबे दणाणले आहे. सिडकोच्या भूखंडावर ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे, त्या ठिकाणच्या नर्सरी हटवण्यात येतील, असे संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.