पाणीपुरवठा वीज बिलावरील विलंब शुल्क माफ

पाणीपुरवठा वीज बिलावरील विलंब शुल्क माफ

पालघर, ता. १९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या थकीत वीजबिलावरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. थकीत देयकासंदर्भात प्रलंबित वीज देयक वसुलीबाबत वन टाइम सेटलमेंट योजना आहे. यासाठी ग्रामविकास विभागातील सर्व जिल्हा परिषद, ग्रामपंचायती तसेच क वर्गातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिवे वीज देयक थकबाकीवरील मूळ मुद्दलवगळता त्यावरील व्याज विलंब आकार माफ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

शासन निर्णय जाहीर महाराष्ट्र शासनाच्या वित्त, नियोजन, कृषी, ग्राम व नगरविकास विभागाच्या झालेल्या बैठकीत सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिवे यांच्यावरील प्रलंबित वीज देयक वसुलीबाबत वन टाईम सेटलमेंट योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेतून सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिवे वीज देयक थकबाकीवरील मूळ मुद्दल वगळता त्यावरील व्याज व विलंब आकार माफ करण्याची कार्यवाही महावितरण कंपनीने त्यांच्या स्तरावर करण्याची मान्यता देण्याचा शासन निर्णय ९ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात विद्युत बिल थकवल्यामुळे बऱ्याचशा पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना सध्या वणवण फिरावे लागत आहे. आता ही योजना लागू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com