अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिराचा रविवारी सुवर्णमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिराचा रविवारी सुवर्णमहोत्सव
अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिराचा रविवारी सुवर्णमहोत्सव

अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिराचा रविवारी सुवर्णमहोत्सव

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : गेल्या ५० वर्षांत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या आणि शहराच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठा वाटा उचलणाऱ्या विरार पूर्व येथील आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर या शाळेच्या प्राथमिक विभागाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सुवर्णमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विरारच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर प्राथमिक विभागाची स्थापना सन १९७३ मध्ये झाली होती. यानिमित्ताने शाळेतील शिक्षकांच्या पुढाकाराने तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रविवारी (ता. २२) सुवर्णमहोत्सव सोहळा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यासंकुल, जीवदानी पाचपायरीसमोर, विरार पूर्व येथे साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शाळेतील आजी तसेच माजी शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.