आमदारांकडून खर्डी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांकडून खर्डी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
आमदारांकडून खर्डी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

आमदारांकडून खर्डी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

sakal_logo
By

खर्डी, ता. १८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी ११ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून खर्डी येथे सुसज्ज व भव्यदिव्य इमारती पूर्ण झाल्या आहेत. या इमारतींची पाहणी करण्याकरिता शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी भेट दिली. खर्डी येथे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी आमदार दौलत दरोडा यांनी जाहीर केले. स्थानिक नागरिकांशी येथील अडीअडचणींबाबत व सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा केली. खर्डी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व उपचार येथेच उपलब्ध होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी सांगितले. यावेळी खर्डीच्या सरपंच मंगला गावित, उपसरपंच मौसीम शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल जाधव, पोलिस पाटील, शाम परदेशी, राष्ट्रवादीचे श्रेयस वेखंडे, चंद्रकांत घरत, आरपीआयचे दीपेश वाघचौडे, नितीन जाधव, प्रकाश धाबे, अय्याज कोतवाल, दीपक सापळे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.