जमनालाल बजाज शिक्षण संस्था टॉप टेनमध्‍ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जमनालाल बजाज शिक्षण संस्था टॉप टेनमध्‍ये
जमनालाल बजाज शिक्षण संस्था टॉप टेनमध्‍ये

जमनालाल बजाज शिक्षण संस्था टॉप टेनमध्‍ये

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक स्वरूपाचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबत विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या देण्यात देशातील विविध शहरांपैकी मुंबईत सर्वात टॉपर म्हणून जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेची नोंद झाली आहे. या संदर्भातील क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे.
इंडियास् बेस्ट बी-स्कूलने २०२२ या शैक्षणिक वर्षातील देशभरातील १० सरकारी अनुदानावर, तसेच स्वायत्त असलेल्या संस्थांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये देशातील विविध शहरांपैकी मुंबईतील सर्वात अग्रेसर म्हणून जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटची पहिल्या क्रमवारीत नोंदणी झाली आहे. त्यासोबतच सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दुसऱ्या आणि मुंबई विद्यापीठातील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट स्टडीज ही संस्था तिसऱ्या स्थानावर आहे; तर नागपूरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था आघाडीवर आहे.
देशभरातील व्यवस्थापन आणि इतर अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षणाच्या पद्धती, त्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा, अनुभव, कॅम्पस प्लेसमेंट आणि भविष्यातील एकूण गरजा, कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातात या संदर्भातील निकष ठरवून इंडियास् बेस्ट बी-स्कूलने त्या संस्थांचे रँक आणि स्कोर जाहीर केले होते. त्यामध्ये देशातील इतर संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकत्ता ही देशात टॉपर ठरली असून त्यानंतर बाराव्या स्थानावर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने आपले नाव कोरले आहे. त्यानंतर नागपूर येथील आयआयएम, मुंबईतील सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्पोरेटिव्ह मॅनेजमेंट आणि मुंबईतील अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट या संस्थांचा क्रम लागतो. सर्वोत्तम आर्थिक मूल्य असलेल्या आणि सहजपणे परवडणाऱ्या देशातील दहा संस्थांमध्ये मुंबईतील सिडनहॅम इन्स्टिट्यूट चौथ्या स्थानावर आणि जमनालाल बजाज सातव्या स्थानावर असून यात राज्यातील या संस्थांचा यात समावेश आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली आमची संस्था आहे. सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ज्ञान, कौशल्य आधारित, तसेच नवसंकल्पना आणि सर्जनशीलता लक्षात घेऊन पदवीधरांना शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. अत्यंत उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने शिक्षणाचा एक विशिष्ट दर्जा जपला जातो. पदव्युत्तर आणि अर्धवेळ असे अनेक व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम येथे आहेत. विद्यार्थ्यांना अनेक नामवंत संस्थांमध्ये नोकऱ्यांची संधी सहजपणे उपलब्ध होते. देशातील अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून संस्थेचा आलेख वाढताना समोर आला आहे.
- श्रीनिवासन आर. अय्यंगार, संचालक जेबीआयएमएस