Fri, Feb 3, 2023

१३ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू
१३ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा जागीच मृत्यू
Published on : 18 January 2023, 2:10 am
मानखुर्द, ता. १८ (बातमीदार) ः चेंबूरच्या चरई तलावामागे असलेल्या सिंधी कॉलनीमध्ये हरिकुंज इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पडून बुधवारी (ता. १८) कामगाराचा मृत्यू झाला. हुसेन (वय २५) असे त्याचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. चेंबूर पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. सिंधी कॉलनी परिसरातील हरिकुंज या बहुमजली इमारतीची डागडुजी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. बुधवारीदेखील नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात झाली होती. काम सुरू असताना दुपारी हुसेनचा तोल जाऊन तो १३ व्या मजल्यावरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.