‘माझा अतुलनीय प्रवास’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माझा अतुलनीय प्रवास’ पुस्तकाचे प्रकाशन
‘माझा अतुलनीय प्रवास’ पुस्तकाचे प्रकाशन

‘माझा अतुलनीय प्रवास’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः कोंटूर ट्रॅव्हल्सचे संचालक अतुल मोहिले लिखित ‘माझा अतुलनीय प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते नुकतेच वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीच्या सभागृहात झाले. मोहिले यांनी एकीकडे पर्यटन व्यवसायात प्रगती करताना दुसरीकडे सद्गुरू माणिक प्रभू यांच्याप्रती केलेली गुरुभावाची आध्यात्मिक मांडणी मनाला जास्त भावली. ज्या लायब्ररीत पन्नास रुपयांची नोकरी केली होती, नंतर त्याच लायब्ररीचे अध्यक्षपद भूषवून आता यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वत:चे वेगळेपण मोहिलेनी सिद्ध केले आहे, असे शेलार यावेळी म्हणाले. नॅशनल लायब्ररीचे प्रमोद महाडिक यांनी प्रास्ताविक केले, तर या पुस्तकाचे प्रकाशक अशोक कोठावळे यांनी या पुस्तक प्रकाशनामागची भूमिका मांडली. अतुल मोहिले यांच्या तन्वी आणि श्रावणी या दोन्ही मुलींनी वडिलांबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले. सूत्रसंचालक मकरंद जोशी यांनी अतुल मोहिले यांची मुलाखत घेतली. याप्रसंगी ठाण्यातील माजी नगरसेवक मनोहर डुंगरे, पटकथा संवाद लेखक अनिल कालेलकर, प्रख्यात गणिततज्ञ डॉ. विवेक पाटकर, अभिनेते राजन भिसे, नॅशनल लायब्ररीचे कार्याध्यक्ष दिनेश सामंत उपस्थित होते.