स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सेजल जेसवाल चमकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सेजल जेसवाल चमकणार
स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सेजल जेसवाल चमकणार

स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत सेजल जेसवाल चमकणार

sakal_logo
By

दिवा, ता. १९ (बातमीदार) : चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत गतिमंद मुला-मुलींनाही आपला खेळ खेळता यावा, यासाठी संधी दिली जाते. पुढील महिन्यात जर्मनी येथे होणाऱ्या स्पेशल ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत भारतातील फुटबॉल संघात दिव्यात राहणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी सेजल सूरजचंद्र जेसवाल हिची निवड झाली आहे. या स्पर्धेत भारतातील संघातून सेंजल खेळणार असून स्पर्धेत खेळताना संघातील इतर खेळाडूंबरोबर संघभावना राहावी म्हणून दोनदा झारखंड, एकदा कोल्हापूर आणि एकदा गुजरात येथे सरावाकरता गेली होती.
दिव्यात राहणाऱ्या सेंजलचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत पूर्वप्राथमिक वर्गात ती शिकते आहे. २०१८ ला ठाण्याला पार पडलेल्या स्पेशल ऑलिम्पिक कॅंपमध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनिता दळवी, दीपक साळुंखे या शिक्षकांनी सेजला कॅंप घेऊन गेले असता तिची फुटबॉल खेळाची आवड व तिचा खेळ पाहून तिला संधी देण्याचे ठरवले. तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय स्तरावर सेंजलने अनेक पदके पटकावली आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या जर्मनीला स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी तिची निवड झाली आहे.