पाले गाव झाले गणिताचे गाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाले गाव झाले गणिताचे गाव
पाले गाव झाले गणिताचे गाव

पाले गाव झाले गणिताचे गाव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील पहिल्यांदाच लोकसहभागातून तयार झाले आहे ते म्हणजे ‘पाले’ गणिताचे गाव. हे गाव उरण तालुक्यातील सर्वात प्रथम गणित गाव म्हणून घोषित होत आहे. मुलांना शाळेबरोबरच आजूबाजूच्या परिसरात खेळतानाही गणित शिकता यावे; तसेच ते सोप्यात सोप कसे करता येईल आणि मुले अगदी सहज कसे गणित शिकतील. याशिवाय त्यांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी अशा गावाची संकल्पना प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने पाले शाळेतील शिक्षकांसोबत मांडली. शाळेतील शिक्षकांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने ती सत्यात उतरवली. हा उपक्रम राज्यात राबविणे आजच्या शिक्षणपद्धतीत गरजेचे बनले आहे.
२२ डिसेंबरला ''गणित दिन'' या दिवशी या गावाची घोषणा केली. मुलांनी ''आमचे गाव, गणिताचे गाव'' अशा घोषणा करत गावातून प्रभातफेरी काढली. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. त्या प्रयत्नाला यश येत १८ जानेवारीला हे गाव ''गणिताच गाव'' म्हणून सत्यात उतरवले. गाव तयार करण्यासाठी पाले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उपेंद्र ठाकूर, शिक्षिका पुष्पलता म्हात्रे, भिंतीना फळे बनवणारे कोणतेही अनुदान न घेता काम करणारे पेंटर नीलेश म्हात्रे, तसेच सहकारी विजय म्हात्रे आणि शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मेनन म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर ज्या गावकऱ्यांनी आपल्या घरांच्या भिंती ''अक्षरभिंती'' बनवण्यासाठी दिल्या, त्यांचे कौतुक केले जात आहेत. या उपक्रमासाठी प्रथम कोकण झोन प्रोग्राम हेड भोजराज क्षीरसागर, प्रथम उरण तालुकाप्रमुख रणिता ठाकूर; तसेच तेथील प्रथम प्रतिनिधी प्रेरणा ठाकूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.