डॉ. आंबेडकर इंग्रजी शाळेचे शासकीय ग्रेड परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर इंग्रजी शाळेचे शासकीय ग्रेड परीक्षेत यश
डॉ. आंबेडकर इंग्रजी शाळेचे शासकीय ग्रेड परीक्षेत यश

डॉ. आंबेडकर इंग्रजी शाळेचे शासकीय ग्रेड परीक्षेत यश

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई महापालिका शिक्षण विभाग तसेच संगीत व कला अकादमी-कला विभागातर्फे महाराष्ट्र शासकीय चित्रकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आयोजित केली होती. या स्‍पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शाळेचा सलग तिसऱ्यांदा १०० टक्‍के निकाल लागला आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते; त्यापैकी साक्षी गुंडू ढोकरे ‘अ’ श्रेणी व श्रेया जयस्वाल, सहानी हर्षराज, अथर्व काळे, शिवम जयस्वार, नावी सिद्धू, आदित्य जयस्वार, प्राची जयस्वार, शनी जयस्वार, तनिषा जाधव, आदित्य कुमार यादव, गायत्री कांबळे, दीपिका गोलर, निहरिका बिल्ला यांना ‘ब’ श्रेणी; तर उर्वरित तीन विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे ज्‍येष्ठ कलाशिक्षक आकाश हिरवे यांनी दिले. या ग्रेड परीक्षेस प्राचार्य दिनकर पवार, प्रशासनाधिकारी वर्षा गांगुर्डे, विभाग निरीक्षिका रुता वानखेडे, मुख्याध्यापिका संगीता श्रीवास्तव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.