शासकीय चित्रकला स्पर्धेत शहा विद्यालय अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय चित्रकला स्पर्धेत शहा विद्यालय अव्वल
शासकीय चित्रकला स्पर्धेत शहा विद्यालय अव्वल

शासकीय चित्रकला स्पर्धेत शहा विद्यालय अव्वल

sakal_logo
By

किन्हवली, ता. २१ (बातमीदार) : राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला, ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या निकालात किन्हवली येथील शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तालुक्यात अव्वल ठरले आहे. किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल सरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्याच्या कला संचालनालयातर्फे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला, ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी एलिमेंटरीला ४० तर इंटर मिजिएटला ३२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले असून, शंभर टक्के निकाल लागला आहे. ३ मुलांना ए.ग्रेड, १४ मुलांना बी. ग्रेड प्राप्त झाली असून शहापूर तालुक्यात अव्वल ठरलेल्या या शाळेचे परिसरातून कौतूक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंद भानुशाली व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थी व चित्रकला शिक्षक सी. जे. सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले आहे.