घणसोलीतील ३३ लाख रुपयांच्या दागिन्यांची लुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतील ३३ लाख रुपयांच्या दागिन्यांची लुट
घणसोलीतील ३३ लाख रुपयांच्या दागिन्यांची लुट

घणसोलीतील ३३ लाख रुपयांच्या दागिन्यांची लुट

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : चोरट्यांनी घणसोली सेक्टर-७ मधील ‘भाग्यश्री ज्वेलर्स’ फोडून त्यातील सुमारे ३३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी या दुकानात लावण्यात आलेला सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर चोरून नेला आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
वाशी सेक्टर- २८ मध्ये राहणारे दिनेशकुमार जैन यांचे घणसोली सेक्टर-७ मध्ये ‘भाग्यश्री’ नावाने ज्वेलर्स आहे. गत १६ जानेवारीला त्यांच्या घरी कार्यक्रम असल्याने त्यांनी दुपारी आपले दुकान उघडले नव्हते. दरम्यान, १७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ‘भाग्यश्री ज्वेलर्स’ या बंद पेढीचे शटर उचकटून त्यातील ३१ लाख रुपये किमतीचे ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, तसेच १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के व इतर दागिने असा सुमारे ३३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जैन आपले दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.